मुंबई-पोलीस नायक ( वृत्तसेवा) :-
दि.१८ मार्च २४ सोमवार
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल सांगता झाली व या कार्यक्रमानिमित्त इंडिया आघाडीचे अनेक नेते एकाच मंचावर आले.उद्धव ठाकरे,शरद पवार,राहुल गांधी,प्रियांका गांधी,प्रकाश आंबेडकर,मेहबुबा मुफ्ती आदींसह अनेक नेते या मंचावर उपस्थित आहेत.यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला तसेच प्रकाश आंबेडकर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.प्रकाश आंबेडकर म्हणाले,आपल्याला लढावे लागेल.एकत्र लढू किंवा एकटे लढू पण लढावे लागेलच.देशभरातील परिस्थितीबाबत मी बोलत आहे.इलेक्ट्रॉल बाँड आलेला आहे.प्रत्येक चॅनेलवर अमित शाहांचे वक्तव्य येत आहे की,इलेक्शनच्या माध्यमातून काळापैसा आम्ही घालवला पण मी मोदी आणि अमित शाहांना विचारू इच्छितो की,फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस कंपनीची नेट प्रॉफिट २१५ कोटी आहे त्यांनी इलेक्ट्रॉल बाँड १३६० कोटींची खरेदी केली आहे.कंपनीचा प्रॉफिट २०० कोटी असतांना त्यांनी बॉन्ड १३०० कोटींचा कसा खरेदी केला ? आपण यांना टार्गेट करायचे की नाही ? मोदींना प्रश्न विचारायचा की नाही ? अमित शाहांनी याचेही उत्तर दिले पाहिजे आपण यांच्यावर ईडीची चौकशी करत होतात पण ही चौकशी आता थांबली आहे.
मोदी म्हणतात की देश त्यांचा परिवार आहे ही गोष्ट खरी आहे की देश त्यांचा परिवार आहे पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्याबरोबर राहत नाही असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.“हिंदू समाजात जे नाते अत्यंत गहिरे असते ते नाते मोदींनी निभवावे आणि आपल्या पत्नीला सांभाळावे” असा खोचक सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिला.मोदी हिंदू संस्कृतीबाबत,हिंदू प्रथेबाबत बोलतात पण ते स्वतः या पाळत नाहीत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे हे मान्य आहे.पण सांस्कृतिक चर्चेला आरएसएसने सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या गोष्टी तेच पाळत नसतील तर ही आपली जबाबदारी आहे की त्यांना त्यांची जबाबदारी पाळायला सांगू असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.