यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मार्च २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज येथे शाळेच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१९ मार्च मंगळवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.१४ एप्रिल रोजी डॉ.आंबडेकर जयंती शाळेला सुटी असल्यामुळे साजरी करता येणार नसल्यामुळे सदरील भीम जन्मोत्सव कार्यक्रम आज दि.१९ मार्च रोजी घेण्याची कल्पना मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी मांडली व ती सत्यात उतरविण्यास त्यांना आज यश देखील आली.त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.प्रसंगी बाळ भीमा ची भूमिका येथील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांचे चिरंजीव हर्षद आढाळे याने साकारली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितीन झांबरे हे होते.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी शाळेतील इ.५ वी ते १० वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित भीम गीते सादर करून भिम जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.प्रसंगी पूनम आढाळे,अपेक्षा वाघ,यशस्वी नेहेते, धनश्री झांबरे,क्रिशिका तायडे,रूषिका आढाळे,दिव्या आढाळे,अश्विनी वाघ,ख़ुशी पारधे,निकिता कोलते,यश वाघ,वैभव वाघ,बाळ भीम हर्षद आढाळे,सिद्धार्थ तायडे,सोहम सपकाळे,रोहित आढाळे,जयपाल तायडे,यश आढाळे,प्रतीक आढाळे,आर्यन पारधे,अनिकेत तायडे,सोहम आढाळे,अजय आढाळे,विजय आढाळे,साहिल आढाळे या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित भीम गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी आपल्या भाषणात आज रोजी आपल्या शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागील कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली.त्याचबरोबर शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमात तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती देऊन या यशात माझ्यासोबत माझे सहकारी शिक्षक वृंद व गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच शाळेत चालविल्या जाणाऱ्या बचत बँक योजना व विविध सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत माहिती विशद केली.यावेळी मुख्याध्यापक नितीन झांबरे,एन.व्ही.वळींकर,पी.पी.कुयटे,आर.व्ही.चिमणकारे,महादेव जानकर,विवेक कुलट,शुभांगी नारखेडे,सोनाली फेगडे,मनीषा तडवी,मोहिनी पाटील,इशिका तायडे,ग्रामस्थ राहुल आढाळे,पराग वाघ, ममता आढाळे,आशा आढाळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकेशना आढाळे हिने केले तर आभार पूनम आढाळे या विद्यार्थिनीने मानले.