यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ मार्च २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील १९२ वर्षाची परंपरा लाभलेल्या तसेच इतक्या वर्षभरापासून सर्व जाती धर्माच्या लोकांच्या एकोप्यातून व सहभागातून साजरा होणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला यंदा १९२ वर्षाच्या इतिहासात अखेर प्रथमच किरकोळ जातीयतेचे गालबोट लागल्यामुळे यात्रोत्सव भीतीच्या व निरुत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
सदरील यात्रोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून दि.२४ मार्च रविवार रोजी “एक गाव एक होळी” या उपक्रमाच्या माध्यमातून गावठाणावर सर्व समाजाच्या भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक होळी पेटविण्यात आली तसेच होळीस प्रदक्षिणा घालून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर काल दि.२५ मार्च मंगळवार रोजी दिवसभर बारा गाड्यांची जुळवाजुळव व गाववेस परिसरातील देवदेवतांची पूजाअर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान पंचवटी हनुमान मंदिरापासून तर खंडेराव महाराज मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या व यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला.सदर यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याचे काम भगत नरेंद्र झांबरे यांनी केले.दरम्यान किरकोळ जातीयवादाचे गालबोट लागल्याचे कारण वगळता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सदर यात्रोत्सव यशस्वितेकरिता वैद्य प्रकाश झोपे,सुनील झांबरे,नितीन भिरूड,पंकज झोपे,प्रभाकर झोपे,दिनेश झोपे,कांतिलाल झोपे,गणेश झोपे,विजय झोपे,सोनू झांबरे,विश्वनाथ भिरूड,अनिल लोहार,शैलेंद्र वाघ,अमोल पाटील,सुभाष कोलते,जयंत चौधरी,पंकज झांबरे,मयूर जावळे,प्रीतम झोपे,महेंद्र पाटील,विशाल झोपे,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,यदुनाथ पाटील,दिलीप तायडे,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,आनंद मेघे,राहुल आढाळे,जुम्मा तडवी,योगेश ठोंबरे,खुशाल कोळी,गणेश जावळे,लीलाधर जंगले,अरविंद पाटील,रबील तडवी,रवींद्र बऱ्हाटे,बिसमिल्ला तडवी,ग्रामपंचायत सदस्य,खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट पदाधिकारी,ग्रामस्थ तसेच सर्व धर्माच्या भाविक भक्तांचे सहकार्य लाभले.