Just another WordPress site

रक्षा खडसेंचे तिकीट ऐनवेळी बदलणार ? अजितदादा गटाच्या नेत्याच्या सूचक विधानाने खळबळ

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० मार्च २४ शनिवार

रावेर येथून भाजपच्या रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्या उमेदवारीवर अद्यापही टांगती तलवार असल्याचे चित्र दिसून येत आहे.याबाबत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी याबाबतचे संकेत दिले असल्यामुळे आता रावेरमधून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात येते की ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते हे पाहावे लागेल.दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिले आहेत.काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही हे सांगता येणार नाही असे म्हणत संजय पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू असून बऱ्याचश्या हालचाली सुरू असल्याचेही संजय पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे व त्यामुळे रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सूचक संकेत दिले आहेत.रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बरीचशी नाराजी आणि कुजबूज यामुळे हालचाली सुरू आहे त्यामुळे काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही हे सांगता येणार नाही.रावेरमध्ये उमेदवार बदलणार असल्याच्या प्रश्नावर संजय पवार म्हणाले,काय होईल ते काहीच सांगता येत नाही.गेल्यावेळी प्रचार करत असतांना स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्यात आले होते मात्र यंदा त्यांचे तिकीट कापले जाणार नाही व त्या उमेदवार म्हणून कायम राहतील.मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात काय होईल ते काही सांगता येत नाही असे म्हणत संजय पवार यांनी सूचक संकेत दिले आहेत.त्यामुळे रावेरमध्ये रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होते की काय ? याबाबत आता संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.