रावेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा अद्याप उमेदवार ठरेना !! दर आठवड्याला नवीन नावे येत आहेत समोर !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० मार्च २४ शनिवार
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार जाहीर करून तब्बल तेरा दिवस झाले आहे.मात्र मविआकडून राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार) कुठलाही उमेदवार जाहीर झाला नसून दर आठवड्याला नवीन नावे समोर येत असल्याने राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये फक्त चर्चासत्र सुरू आहे.महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे ज्यात चौथ्या टप्प्यात रावेर मध्ये मतदान होणार आहे.दरम्यान भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सक्षम उमेदवाराचा शोध घेत असून राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने तारीख पे तारीख सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षप्रमुख शरद पवार व पक्षाच्या काही नेत्यांची बैठक पार पडली.यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष बैठकीस उपस्थित होते.
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुरुवातीला एकनाथराव खडसे यांचे नाव पुढे आले होते व एकनाथराव खडसे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र प्रकृती स्थिर नसल्याकारणाने त्यांनी उमेदवारी नाकारली त्यानंतर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली मात्र त्यांनीही आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारी नाकारली.तर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपली उमेदवारी निश्चित झाली असे सांगितले त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढत मोठा जल्लोषही केला मात्र पक्षाकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी आधी नकार देत नंतर रावेर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा केला त्यांनी मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या त्यानंतर यावलचे अतुल पाटील यांचे नाव चर्चेत आले.अतुल पाटील हे यावल शहराचे माजी नगराध्यक्ष होते त्यांना देखील मुंबईमध्ये बैठकीत बोलवण्यात आले होते मात्र आर्थिक सक्षम नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.उमेदवारासाठी इच्छुक असलेले विनोद सोनवणे व श्रीराम पाटील यांच्याही नावाची चर्चा झाली.पक्षाकडून सर्व तालुका अध्यक्षांचे मते जाणून घेतले दरम्यान या जागेसाठी पक्षातून वेगवेगळी नावे चर्चेच येत आहेत त्यामुळे नावाविषयी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.