मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली होती.सदरील पैसे मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली पहायला मिळाली त्यामुळे गेडाम यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यामध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे सादर केली.सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानि लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात.मी गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया,दोन रुपये,पाच रुपये,दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे.सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे असे गेडाम म्हणाले.जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.