Just another WordPress site

यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा-शिवसेना शिंदे गटाचे नितिन सोनार यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३ एप्रिल २४ बुधवार

येथील नगर परिषदला मागील एक वर्षापासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने यावल शहरवासीयांच्या समस्यांचे व अडचणींचे निराकरण होत नसल्याने नागरीकांमध्ये कमाली नाराजी पसरली असुन शासनाने या ठीकाणी तात्काळ कायमस्वरूपी मुख्यधिकारी द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच एका दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

सदरील निवेदनात शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितीन सोनार यांनी म्हटले आहे की,यावल नगर परिषदला मागील एक ते दिड वर्षापासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याकारणाने या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारीकडे नगर परिषदचा कारभार असल्याने ते वेळेवर मिळत नसल्याने शहरातील नागरीकांचे विविध शासकीय काम व नागरी समस्यांचे वेळेवर निराकरण होत नसल्याने यावल नगर परिषदच्या कारभारावर मोठी नाराजी शहरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत असुन वारंवार नगर परिषदच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. दरम्यान यावल नगर परिषदला कायमस्वरूपी मुख्यधिकारी अभावी यावल नगर परिषदचा पुर्ण कारभार वाऱ्यावर चालले असल्याने प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणुक करावी अशा आशयाच्या मागणीच्या निवेदनाव्दारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.