Just another WordPress site

काळाडोह पाडयावर वन विभागाच्या कारवाईत हरिणाचे मास शिजवतांना एकास रंगेहात पकडले

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.५ एप्रिल २४ शुक्रवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वनजंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणाची शिकार करून त्याचे मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.सदरील आरोपी हवलदार बारेला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील काळाडोह या ठीकाणी भेकर या प्रजातीची शिकार करून तिचे मास शिवजवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच व वनक्षेत्राचे पथकासह मौजे काळाडोह पाड्यावर जाऊन संशयीत आरोपी इसम नामे हवलदार नहारसिंग बारेला याला सापडा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.सदरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस काल दि.४ एप्रिल गुरुवार रोजी न्यायाधीश यावल यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.सदर गुन्हेकामी वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र.रि.क्रमांक ०३/२०२४ दि.३ एप्रील रोजी नोंदविण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे हे करीत आहेत.सदरील कार्यवाही ही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यावल,यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या कुशल  मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाहीमध्ये यावल पूर्व वनक्षेत्रातील कर्मचारी राजेन्द्र तायडे,बि.बि.गायकवाड यांच्यासह पुर्व व पश्चीम क्षेत्राचे कर्मचारी आणी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.