काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय? – तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन.आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे आश्वासन.सरकारी नोकऱ्यांमधील कत्रांटी धोरण रद्द करण्याचे आश्वासन.विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये, म्हणून कायदा केला जाणार.
गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन.शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपीचे आश्वासन.शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास एका महिन्यात मदत मिळणार.शेतकऱ्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्याचे आश्वासन.असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणणार.बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देण्याचे आश्वासन.अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासन.पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येणार.गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचे आश्वासन.पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन अशा विविधांगी व प्रत्येक नागरिकांच्या गरचेचे असलेला जाहीरनामा हा सादर करण्यात आला आहे.