न्यायालयाच्या परवानगीशिवाय सेन यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाता येणार नाही त्यांना त्यांचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे.याशिवाय सेन यांना मोबाईल फोनची लोकेशन कायम सुरू ठेवून त्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे.भीमा कोरेगाव प्रकरणातील सोळा आरोपींपैकी शोमा सेन जामीन मिळविणाऱ्या सहाव्या आरोपी आहेत यापूर्वी या प्रकरणात सुधा भारद्वाज,आनंद तेलतुंबडे,वर्नन गोन्साल्विझ,अरुण फेरेरा,वरवरा राव आणि गौतम नवलखा यांना जामीन मंजूर झाला आहे.सर्वोच्च न्यायालयात शोमा सेन यांच्यावतीने ॲड.आनंद ग्रोवर यांनी बाजू मांडली.युएपीए कायद्याच्या अंतर्गत सेन यांच्याविरोधात सबळ पुरावे नाही तसेच नक्षलवादी चळवळीशी त्यांच्या संबंधाबाबतही तपास यंत्रणांनी पुरावे सादर न केले असल्याचा युक्तीवाद ॲड.ग्रोवर यांनी केला.एनआयएच्यावतीने हा युक्तिवाद फेटाळण्यात आला मात्र मागील सुनावणीत सेन यांना अधिक काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचेही कबूल केले होते.याप्रकरणी  एनआयएच्यावतीने अतिरिक्त महाधिवक्ता ॲड.के.एम.नटराज यांनी युक्तिवाद केला.