यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ एप्रिल २४ सोमवार
येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे यावल तालुका उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले संतोष सुरवाडे यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर आर.पी.गिरी यांनी नुकतेच सदरील पदाची सुत्रे सांभाळली आहेत.
यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील पाणी पुरवठा विभागा अंतर्गत जलजिवन मिशन व आदी योजनांचा समावेश असुन या विभागात उपविभागीय अधिकारी म्हणुन यावल येथे कार्यरत राहुन मागिल तिन वर्षापासुन सुरवाडे यांच्याकडे होती.मात्र त्यांची नुकतीच यावलहुन जळगाव येथे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या ठीकाणी मेहकर जिल्हा बुलढाणा येथुन बदली होवुन लोणार जिल्हा बुलढाणा येथील मुळ रहीवासी आर.पी.गिरी यांनी यावल ग्रामीण पुरवठा विभागाचा पदभार स्विकारला आहे.यावल तालुक्यात सद्यस्थितीला पाणीटंचाई नसल्याचे त्यांनी सांगीतले.दरम्यान जलजिवन योजनेअंतर्गत यावल तालुक्यात जवळपास ६९ कामे ही प्रगतीपथावर असुन १० ते ११ कामे ही अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.