Just another WordPress site

यावल येथील डॉ.अभय रावते ‘जळगाव युथ आयकॉन-२०२४’ पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.८ एप्रिल २४ सोमवार

येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.अभय रावते यांना संस्कृती मिडीया व स्माईलस्टोन फाउंडेशन तसेच सप्तरंग इव्हेंट व्दारा आयोजित “जळगाव युथ आयकॉन-२०२४” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

जळगाव येथील कमल पॅराडाईज हॉटेलमध्ये “जळगाव युथ आयकॉन अवॉर्ड २०२४” कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.सदरील  कार्यक्रमात सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,वैद्यकीय,उद्योजक व विधी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी कार्यक्रमामध्ये यावल येथील एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावलचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक व सांस्कृतीक असे विविध उपक्रम राबवुन आपल्या कार्यातुन आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ.अभय गणेश रावते यांना “जळगाव युथ आयकॉन २o२४” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावल शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्त म्हणुन आपली ओळख निर्माण करणारे डॉ.अभय रावते यांनी सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी व हिंदी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होत्या व त्यांच्या हस्ते डॉ.अभय गणेश रावते यांना जळगाव युथ आयकॉन २०२४ या पुरस्काराने गौरवण्यात आले.जळगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.निलेश चांडक व डॉ.संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.