Just another WordPress site

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० एप्रिल २४ बुधवार

येथील जिल्हा परिषदचे माजी गटनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे (अप्पा) यांची काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेवरून व देशाचे युवा नेतृत्व खासदार राहुल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकाअर्जुन खरगे यांच्या सक्षम नेतत्वाखाली कार्य करणारे व पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले जिल्हा परिषदचे माजी गटनेते व काँग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे ( अप्पा ) यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना जिल्हा पातळीवर कार्य करण्याची संधी दिली आहे.प्रभाकर सोनवणे यांच्या निवडीचे पक्षाच्या वतीने आमदार शिरीष चौधरी,एनएसयुआयचे धंनजय चौधरी,शेखर पाटील,हाजी शब्बीर खान,हाजी गप्फार शाह,मारूळ सरपंच सैय्यद असद अली,जावेद अली,वढोदा सरपंच संदीप सोनवणे,उमेश जावळे,जलील पटेल,सतिष पाटील,कदीर खान,अनिल जंजाळे,असलम शेख नबी,मनोहर सोनवणे,गुलाम रसुल मेंबर,रमेश पाटील,सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,फैजान शाह,विवकी गजरे यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.