Just another WordPress site

भाजपला तगडे आव्हान !! कमळ सोडून तुतारीला साथ देणारे श्रीराम पाटील रावेरमधून मैदानात !!

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० एप्रिल २४ बुधवार

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी दिड महिन्यातच हातातले कमळ सोडले आणि तुतारी वाजवली.दरम्यान भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेल्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.एकनाथराव खडसे यांनी शरद पवार गटाची साथ सोडून भाजपमध्ये परतण्याचे संकेत दिल्यानंतर पक्षातर्फे रावेरमधून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता.रविवारी पुण्यातील मोदीबागेत याबाबत दुपारी बैठक झाली यात स्वत: शरद पवार यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.यात रवींद्रभैय्या पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावे निश्‍चित करण्यात आली यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रावेर लोकसभा उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान श्रीराम पाटील यांचे नाव रावेरातून पक्षातर्फे उमेदवार म्हणून निश्‍चित झाले असून आज प्रसिद्धी पत्रक काढून घोषणा करण्यात आली आहे.श्रीराम पाटील यांनी गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती.मात्र आता ते थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान स्वत: शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.