“नरेंद्र मोदी इमोशनल ब्लॅकमेलिंग का करतात ?,दगडात देव असतो का ?”-पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ एप्रिल २४ शनिवार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन नरेंद्र मोदींना दगडात देव असतो का ? असा प्रश्न विचारला आहे तसेच ज्या लोकांनी मोदींना मतदान केले ते लोक नाचत आहेत.अयोध्येत राम मंदिर बांधले त्यामुळे फारसा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. गावात खासगी मंदिर बांधणे आणि अयोध्येत राम मंदिर बांधणे यात काय फरक आहे ? नरेंद्र मोदींना राम मंदिराचा राजकीय फायदा घ्यायचा होता.अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही.नरेंद्र मोदी इमोशनल ब्लॅकमेलिंग का करतात ? दगडात देव असतो का ? मला वाटले तर मी कऱ्हाड येथील मंदिरात जाईन.मोदींनी मुद्दे घेऊन निवडणूक लढवली पाहिजे असे परखड मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे.
नरेंद्र मोदी आणि भाजपाचे सरकार घालवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे.बंडखोरी होते आहे असे लक्षात आले तर त्या कार्यकर्त्यांना शांत केले पाहिजे.महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे.कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या ? यावर चर्चा झाली त्यानंतर आम्ही दिल्लीतल्या पक्षाशी बोललो.जागांची अदलाबदल होऊ शकते त्यात काही हरकत नाही.मी पक्षाचे नाव घेणार नाही पण दोन पक्षांच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.काही वेळापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जर कुणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकते.मतदारसंघाची वाटणी,इतिहास,स्थानिक पातळीवरची संघटना या संदर्भात मांडणी झालेली नाही.उशीर झाला आहे हे मान्य आहे पण पहिल्यांदाच तीन पक्षांची आघाडी झाली आहे.अशोक चव्हाण यांना आम्ही चांगले खाते देणार होतो मात्र आता ते राज्याच्या राजकारणातून बाहेर गेले आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत तसेच राष्ट्रीय पक्षांना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.