सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ एप्रिल २४ मंगळवार
परगावी असलेली नोकरी सोडून सासरी येऊन राहात नाही म्हणून चिमुकल्या मुलीच्या देखत पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार अकलूजजवळ नुकताच घडला आहे.आफरीन फिरोज काझी वय ३७ असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत आफरीन काझी हिचे वडील मैनोद्दीन कासम शेख रा. सांगोला यांनी याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी आफरीन ही सांगोल्यात नोकरी करून माहेरीच राहायची व अधुनमधून सासरी अकलूजमध्ये यायची तसेच तिने नोकरी सोडून सासरी येऊन राहावे असा पती फिरोजचा हट्ट होता.परंतु नोकरी सोडण्यास आफरीन तयार नव्हती व याच कारणातून फिरोज याने अकलूजजवळ पत्नी आफरीन आणि मुलगी जोया यांना दुचाकीवर बसवून नेतांना वाटेत फिरोज याने भांडण काढले आणि रागाच्या भरात आफरीनवर सशस्त्र हल्ला करून मुलगी जोया हिच्या डोळ्यांदेखत वडिलांनी आईचा खून केला व नंतर फिरोज याने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदरील गुन्ह्याचा तपास अकलूज पोलीस करीत आहेत.