अनावश्यक दबावांपासून न्यायपालिकेचे संरक्षण करण्याची गरज या मथळ्याखाली निवृत्त न्यायाधीशांनी पत्र लिहिले आहे.न्या.दीपक वर्मा, न्या.कृष्णा मुरारी,न्या.दिनेश माहेश्वरी,न्या.एम.आर.शाह या सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचाही यात समावेश आहे.संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक लाभ यासाठी हे या टीकाकारांचे हेतू आहेत आणि ते न्यायासंस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.राजकीय प्रभाव आणि खोट्या माहितीच्या प्रसाराी रणनीती यापासून न्यायालयीन स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता यांचे संरक्षण करण्याची गरज आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.पत्र लिहिणाऱ्या न्यायाधीशांनी न्यायपालिकेवर दबाव टाकणाऱ्या कोणत्या घटना घडल्या याचा उल्लेख केलेला नाही.काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांच्यासह देशातील सुमारे ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना याचप्रकारे पत्र लिहून न्यायपालिकेवर दबाव आणला जात असल्याचे मत व्यक्त केले होते.