Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज !! यावल तालुक्यातुन २११ केन्द्रावर २ लाख १० हजार ५५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ एप्रिल २४ बुधवार

यावल तालुका हा विधानसभा क्षेत्र नसल्याने रावेर-४ या लोकसभा मतदार संघासाठी चोपडा १० व रावेर ११ या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असून रावेर विधानसभा ११ मतदारसंघात ६९ गावांमध्ये १४४ मतदान केंद्र असून १,४२,२३३ मतदार असून यात पुरुष मतदार ७३,३२६ व महिला मतदार ६८,९०६ तर ०१ तृतीय पंथीय असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

या संदर्भात माहिती देतांना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर म्हणाल्या की,चोपडा १० मतदारसंघात ४८ गावांमध्ये ६७ मतदार केंद्र असून ६८,३२३ मतदार आहेत यात पुरुष ३५, ७५४ मतदार आहेत व महिला ३२,५६९ मतदार आहेत तर या मतदान संघात तृतीयपंथी मतदार नाही.
यामध्ये शाडो मतदान केंद्र लंगडा आंबा,उसमळी,जामण्या,गाडऱ्या,अंबापानी,रुईखेडा हे सर्व चोपडा १० विधानसभा मतदारसंघात असून फक्त एकच चारमळी रावेर विधान सभा मतदारसंघात आहे.मतदानाची टक्केवारी वेळोवेळी पोहोचवण्यासाठी व काही अडचणी उद्भवल्यास संपर्क साधण्यासाठी मोटर सायकल स्वार व रनर ठेवण्यात आले आहे तसेच ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही असे ८५ वर्ष वयाच्या वरील मतदार चोपडा मतदारसंघातील ३ आहे व रावेर मतदारसंघात ३५ असून तर दिव्यांग मतदार १४ आहेत असे एकूण ४९ मतदार दोन्ही विधानसभा क्षेत्रातील आहेत यांची मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल पथकाचे आयोजन केले आहे.
यावल तालुक्यातील वाहतूक आराखडा पुढील प्रमाणे आहे.यात यावल तालुक्यातील ११ रावेर विधानसभासाठी १४४ मतदान केंद्र ६९ गावांसाठी असल्याने बस १९ ,मीनी बस ०४,क्रूजर २५ असे एकूण ४८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे तर चोपडा १० मतदारसंघासाठी ६७ मतदान केंद्र असून ४८ गावांमध्ये आहे त्यासाठी बस ११ व जिप १२ अशा २३ वाहनांची व्यवस्था केली आहे.यामध्ये रावेर ११ विधानसभा मतदारसंघात यावल तालुक्याला लागून महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमा क्षेत्रावर असलेल्या गाव भगवानपुरा,खरगोन (मध्यप्रदेश) यांच्याशी सुद्धा संपर्क साधून आहेत अशी माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे.यावेळी निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.