यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ एप्रिल २४ बुधवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजातील तरुण कार्यकर्ते शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पातळीवर,तालुका पातळीवर व गावपातळीवर संघटन कार्य बळकट करण्यासाठी पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजातील तरुण कार्यकर्ते शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.सदर निवड राष्ट्रवादी पक्षाचे जळगाव जिल्हा ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश दत्तात्रय पाटील यांनी शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा यांची यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे.शेख मुस्तकिम (सद्दामभाई) यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील,तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ता व लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील,युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पवन पाटील,राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी एम.बी.तडवी,मोहसीन खान,नाना कौत्तीक बोदडे,बापु जासुद,अय्यूब खान,अरूण लोखंडे,आबिद कच्छी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.