Just another WordPress site

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदान ! त्रिपुरा राज्यात सर्वाधिक ७९.९० टक्के तर बिहारमध्ये ४७.४९ टक्के सर्वात कमी मतदान !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० एप्रिल २४ शनिवार

१९ एप्रिल शुक्रवार रोजी महाराष्ट्रासह एकूण २१ राज्यांमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान करण्यात  झाले.आता वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे.संपूर्ण देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून यातील पहिला टप्पा काल दि.१९ एप्रिल रोजी पार पडला.याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ५५.२९ टक्के मतदान पार पडले तर  इतर २० राज्यांची स्थिती काय ते आपण जाणून घेणार आहोत.दरम्यान काल दि.१९ एप्रिल रोजी महाराष्ट्रासह एकूण २१ राज्यांमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले.

यात २१ राज्यांमधील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.अंदमान निकोबार ५६ टक्के,अरुणाचल प्रदेश ६५.४६ टक्के,आसाम ७१ .३८ टक्के,बिहार ४७.३८ टक्के,छत्तीसगड ६३.४१ टक्के,जम्मू काश्मीर ६५.०८ टक्के,लक्षद्विप ५९.०२ टक्के,मध्यप्रदेश ६३.३३ टक्के,महाराष्ट्र ५५.२९ टक्के,मणिपूर ६८.६२ टक्के,मेघालय ७०.२६ टक्के,मिझोरम ५४.१८ टक्के,नागालँड ५६.७७ टक्के,पुद्दुचेरी ७३.२५ टक्के,राजस्थान ५०.९५ टक्के,सिक्कीम ६८.०६ टक्के,तामिळनाडू ६२.०६ टक्के,त्रिपुरा ७९.९० टक्के,उत्तर प्रदेश ५७.६१ टक्के,उत्तराखंड ५३.६४ टक्के तर पश्चिम बंगाल ७७.५७ टक्के असे मतदान झाले आहे.दरम्यान काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत समोर आलेली ही टक्केवारी आहे.या टक्केवारीनुसार त्रिपुरा या राज्यात सर्वाधिक ७९.९० टक्के मतदान झाले आहे तर बिहारमध्ये ४७.४९ टक्के सर्वात कमी मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर ते सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात.२०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झाले होते मात्र भाजपाच सत्तेत आली होते.२००९ मध्ये २०१४ मध्ये जास्त मतदान झाले होते तेव्हा सत्तातांर झाले होते.यावेळी मतदान कमी झाले आहे व त्याचा फायदा कुणाला होणार हे येत्या ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.