देशभर महागाई वाढली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे लोकांना संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे.गेल्या १० वर्षांपासून देशात तुमचे सरकार आहे आणि तुम्ही (नरेंद्र मोदी,भाजपा) आम्हाला आमच्या कामांचा हिशेब विचारता.देशात महिला-भगिनींवर अत्याचार होत आहेत त्यावर तुम्ही काही बोलला नाहीत व काही केले नाही.आमच्या काळात एकही अत्याचाराची घटना घडली नव्हती.आम्ही मणिपूरला शिष्टमंडळ पाठवले होते तेव्हा असे कळले की,पीडितांच्या घरांवर हल्ले झाले,तिथल्या महिलांवर अत्याचार झाले तरी सरकारने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही.कोरोना काळात अनेक लोक आपल्या गावी गेले मात्र सरकारने लोकांना न्याय देण्याचे काम केले नाही.राज्यात सर्व शेतकरी संकटात आहे त्यामुळे तिथे आपले वजन असणे गरजेचे आहे.शरद पवार म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचे काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नसतांना ते मला प्रश्न विचारत आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे.