Just another WordPress site

“भारतीय मुसलमान घुसखोर…” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ एप्रिल २४ सोमवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथे सभेला संबोधित करतांना मुस्लिम समुदायाचा उल्लेख घुसपैठिया असा केला असून यावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांच्यावर टीका केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतरही काँग्रेसने शांततेची भूमिका घेतली असल्याने त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.“भारतीय मुसलमान घुसपैठिया (घुसखोर) नाहीत ते आपल्या विविध,बहुवचन आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत.आपण सर्वच नागरिक आहोत असे  प्रकाश आंबेडकर म्हणाले.आरएसएस-भाजप भेदभावपूर्ण धोरणांद्वारे भारतातील मुस्लिमांना हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत आहेत तर काँग्रेसने मौन बाळगले आहे.एक प्रमुख उदाहरण म्हणजे CAA-NRC अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राजस्थानच्या बन्सवाडा भागात काल रविवारी मोदींची प्रचारसभा झाली यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे.याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची जास्त मुले आहेत त्यांना वाटणार,घुसखोरांना वाटणार.तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का ? तुम्हाला हे मान्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला होता.काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील.मनमोहन सिंग सरकारने म्हटले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे.हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचे मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत असेही मोदी यावेळी म्हणाले.आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते.भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला.जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते.ते काँग्रेसच्या नावावर ढकलून,राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते असे सांगून टाकले हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते हेच कळत नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैव आहे. एवढे सगळे बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल असे काही वाटत नाही.पण देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत कारण की निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.