Just another WordPress site

“मोदींमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संविधान बदलू इच्छिणाऱ्या भाजपा नेत्यांची हकालपट्टी करावी” काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे जाहीर आव्हान

केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ एप्रिल २४ मंगळवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहेत ते देशातल्या जनतेशी खोटे बोलतात अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे.मल्लिकार्जुन खरगेंनी केरळच्या एका प्रचारसभेत ही टीका केली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खुले आव्हानही दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १०० टक्के खोटारडे आहेत.तुम्हाला वाटेल मी असे का बोलतो आहे.पण तुम्हीच आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय  काय आश्वासने दिली होती ? ‘प्रत्येकाला १५ लाख देणार’असे आश्वासन दिले होते.तुम्हाला मिळाले का १५ लाख रुपये ? दोन कोटी रोजगार संधी दरवर्षी निर्माण करु म्हणाले होते झाले का ? १० वर्षात २० कोटी नोकऱ्या त्यांनी निर्माण केल्या का ? मग हा खोटारडेपणा नाही तर काय ? असा सवाल खरगेंनी केला आहे तसेच मोदींना त्यांनी एक आव्हानही दिले आहे.मोदींमध्ये हिंमत असेल तर..“मी मोदींना आव्हान देतो त्यांच्यात जर हिंमत असेल आणि त्यांना जर देशातल्या गरीबांची चिंता असेल देशातली न्याय व्यवस्था समान पातळीवर आणायची असेल तर त्यांनी अशा भाजपा नेत्यांची हकालपट्टी करावी जे सांगतात आम्ही सत्तेवर आलो तर संविधान बदलू.मोदी ही कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का ?” असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी विचारला आहे.

मागच्या वर्षी मोदींनी १४ विदेशवाऱ्या केल्या पण मणिपूरला गेले नाहीत.सबका साथ सबका विकास हा नारा मोदींनी सत्तेवर आल्यावर दिला होता.त्यांना सबका साथ तर मिळाला पण त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केला आहे.हिंदू महासभा आणि जनसंघ यांनी सुरुवातीला आणि नंतर भाजपाने संघाने देशात फूट कशी पडेल यावरच लक्ष्य केंद्रीत केले.हिंदू महासभा आणि जनसंघाने तर ब्रिटिशांची मदत केली मात्र आता काही लोक म्हणत आहेत की ते देशभक्त होते आणि काँग्रेसने काही केले नाही.मागच्या वर्षभरात मोदींनी १४ देशांचा दौरा केला.शेकडो सभा घेतल्या पण ते मणिपूरला गेले नाहीत.मणिपूर जळत होते,तिथल्या स्त्रिया आक्रोश करत होत्या,घरे पेटवली जात होती पण त्यांना मणिपूरला आपल्या देशातल्या एका राज्यात जावे असे मुळीच वाटले नाही असेही खरगे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.