Just another WordPress site

यावल येथे तालुकास्तरीय खरीप पिक-२४ नियोजन आधारित मार्गदर्शन बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ एप्रिल २४ बुधवार

येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शेतीतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित तालुका स्तरीय खरीप हंगाम २०२४ च्या पिकपेरणी नियोजन संदर्भातील मार्गदर्शनाबाबत आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.

तहसील कार्यालयातील दालनात संपन्न झालेल्या या आढावा बैठकीस भरत वारे सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यावल,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख महेश महाजन मंडळ कृषी अधिकारी फैजपूर,किनगाव निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते,यावल कृषि पर्यवेक्षक,तालुका कृषी अधिक्षक,यावल कृषि अधिकारी पंचायत समिती,यावल पिक विमा तालुका प्रतिनिधी,अध्यक्ष कृषी सेवा केंद्र निविष्ठा विक्रेते संघटना यावल, केळी उत्पादक निर्यात दार प्रगतशील शेतकरी यावल,सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी,अग्रणी बँक प्रतिनिधी,आपले सरकार सेवा केंद्र प्रतिनिधी,सहायक निबंधक यावल तसेच कृषी विभाग व महसूल विभागातील क्षेत्रीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी खरीप हंगाम २०२४ पूर्व तयारी नियोजनाबाबत अध्यक्ष तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मागील वर्षाचे विविध योजनेतर्गत लक्ष व सध्याबाबत आढावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच खरीप हंगाम २०२४ चे नियोजन,अडचणीबाबत चर्चा करणेत आली.तालुका कृषी अधिकारी यावल यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांच्या मागील वर्षीचे लक्ष सध्य व चालू हंगामातील योजना निहाय नियोजनबाबत सादरीकरण करून मार्गदर्शन व चर्चा केली.तर कृषी विज्ञान केंद्र पाल येथिल वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी १०% रासायनिक खताचा वापर कमी करून माती परीक्षण नुसार सेंद्रिय,नैसर्गिक शेती नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातील विविध प्रमुख पिकाचे उत्पादन वाढ तंत्र,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन,एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.