Just another WordPress site

“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे” ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार

गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आणि प्रयोग वाढले आहेत व आता असाच एक वेगळ्या पद्धतीचा आधुनिक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आलाय.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि मुंबई पोलीस बोलत असल्याचे भासवून सुरेश कबाडिया (नाव बदलेलेल आहे) नामक व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न झाला.सुरुवातीला ट्रायडून बोलत असल्याचा दावा करून व्हॉईस कॉल करण्यात आला.संबंधित फोन नंबर दोन तासांच्या आत ब्लॉक केला जाईल आणि अधिक माहितीसाठी ९ दाबण्याची सूनचा सुरेशला करण्यात आली.सुरेशने ९ क्रमांक दाबल्यावर तो फोन कथित दूरसंचार विभागातील व्यक्तीला ट्रान्सफर झाल्याची बतावणी करण्यात आली.दूरसंचार विभागातील कथित व्यक्तीने सुरेशला माहिती दिली की त्याच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या नंबरवर बेकायदा जाहिराती केल्याबद्दल आणि मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्रासदायक मजकूर पाठवल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच मुंबई पोलिसांनी ट्रायला मोबाईल नंबर ब्लॉकिंग विनंती पाठवली असून आधार मालकाशी संबंधित सर्व नंबर ब्लॉक करण्याचे विनंती केली.एवढेच नव्हे तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने बनावट तपशील दिले आणि अंधेर पूर्व पोलीस स्टेशनला पाठवल्याचा दावा केला.हा कॉल नंतर दुसऱ्या स्कॅमरशी जोडण्यात आला. त्यांनी मुंबई पोलीस उपनिरिक्षक असल्याचा बनाव केला.या व्यक्तीने काही वैयक्तिक तपशील गोळा केले आणि सांगितले की प्राप्तकर्ता (सुरेश) मुंबईत उपस्थित राहू शकत नसल्याने स्टेटमेंट रेकॉर्ड करणे आवश्यक आहे.

सुरेशला पुन्हा तिसऱ्या व्यक्तीकडून व्हीडिओ कॉल आला.व्हीडिओ कॉल करणारा पोलिसांच्या गणवेशात होता तसेच अस्खलित इंग्रजीतून संवाद साधत होता.तो मराठीत बोलत नसल्याने सुरेशचा संशय वाढला.व्हीडिओ कॉल करणाऱ्याने या प्रकरणचा तपास करण्याचे खोटे आदेश कॉन्स्टेबलला दिले.इथे मात्र सुरेशला आपली फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्याने स्मार्टपणे हे प्रकरण हाताळायचे ठरवले. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर चौथ्या घोटाळेबाजाने सुरेशकडून आधार कार्ड क्रमांक मागितला त्याने जाणूनबुजून चुकीचा क्रमांक दिला परंतु तरीही या आधार कार्ड क्रमाकांवर ६५ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला.सुरेश काहीतरी माहिती लपवत असल्याचा सशय असल्याने घोटाळेबाजाने याबाबत विचारले.त्यावेळी सुरेशने अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिले.मी दाऊद इब्राहिमचा काका आहे असे सुरेशने म्हटले त्यावर त्यांनी विचारले कोण दाऊद ? मी म्हटले दाऊद इब्राहिम.यानंतर तत्काळ सुरेशने सोशल मीडियावर संबंधित प्रकार पोस्ट केला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.