Just another WordPress site

आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू !!

गोवा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार

गोव्यात दोन भावांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण नुकतेच समोर आले असून दोन्ही मुलांसह त्यांची आई देखील घरातच बेशुद्धावस्थेत आढळली आहे.दोन्ही भाऊ भुकेने मरण पावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांची आई दोन्ही मुलांकडून कडक उपवास करून घेत होती व गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही मुले दिवसाला केवळ एक खजूर खात होती. कॅशेक्सिया आणि कुपोषण हे दोन्ही मुलांच्या मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केले आहे.मोहम्द जुबैर खान आणि अफान खान अशी या मृत मुलांची नावे असून त्यांची आई रुक्साना खान हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.तिच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार आणि मानवी व्यवहार संस्थेत (IPHB) पाठवले जाणार आहे.

या मुलांचे वडील नजीर खान आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी २४ एप्रिल रोजी मडगाव एक्वेम येथे आले होते तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस नजीर खान यांच्या घरी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले.पोलिसांनी घरात पाहिले की अफान खान एका खोलीत मृतवस्थेत पडला होता तर जुबेर दुसऱ्या खोलीत पडला होता तर त्यांची आई अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडली होती.इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या मुलांचे वडील नजीर खान हे पत्नीबरोबर सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून मडगावमधील दुसऱ्या घरात राहायला गेले होते.उपवास करणे, अनियमितपणे जेवण करणे हे पती-पत्नीच्या भांडणाचे प्रमुख कारण होते.दरम्यान नजीरचे भाऊ आणि मृत अफान,जुबेर यांचे काका अकबर खान म्हणाले रुक्साना आणि तिची मुले गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर आले नव्हते.तिघेही बाहेरच्या जगाशी पूर्णपणे विभक्त झाले होते. अकबर खान म्हणाले नजीरचे घर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे.तरीदेखील त्याच्या पत्नी आणि मुलांनी अशा प्रकारण उपवास करणारे आम्हा सर्वांना कोड्यात टाकणारे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.