Just another WordPress site

नाशिक-औरंगाबाद रोडवर भीषण अपघात;१० जण जळू खाक तर ३४ जण गंभीर जखमी

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):- नाशिक-औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला.सदरील अपघात एवढा भीषण होता कि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला.दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाले असून ३४ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.ट्रॅव्हल बस  ही यवतमाळ येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.या बसने पेट घेतल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले त्यांनी उड्या मारून आपला जीव वाचविला परंतु आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीत होरपळून मरण पावले.त्यामुळे या आगीत मृत झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.या अपघातानंतर सदर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन थांबला.या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले.या भीषण दुर्घटनेत १० लोक जळून खाक झाले तर ३४ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातानंतर काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेऊन या अपघाताची माहिती दिली.मात्र पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.