सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० एप्रिल २४ मंगळवार
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली.महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या हे सांगत असतांना उद्धव ठाकरेंनी भाजपावर,नरेंद्र मोदींवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली तसेच नकली शिवसेना या मोदींनी केलेल्या टीकेचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला.या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूज असा केला.भाजपा म्हणजे काही ब्रह्मदेव नाही.भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व,भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपाच्या विरोधात बोलणारा देशद्रोही असे नाही.मोदींना मी सांगू इच्छितो की नकली शिवसेना जे काही आम्हाला हिणवत आहात तसे म्हणायला ती तुमची डिग्री नाही.४ जूनला तुम्हाला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कोण असली कोण नकली ते समजेल.आज सोलापूरचे प्रश्न आहेत,राज्याचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष कुठे आहे ? प्रणितीचाच आवाज लोकसभेत पाठवायचा आहे हे विसरु नका.वापरा आणि फेकून द्या ही यांची नीती आहे.२०१४ मध्ये देशात पंतप्रधान झाले ऑक्टोबरमध्ये युती तोडून टाकली.त्यामागचे कारण काय होते ? २०१९ मध्येही पंतप्रधानपदी बसले तेव्हाही अमित शाह यांना वचन सांगितले होते त्यांनी शब्द मोडला.”वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे” असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
तुम्ही कुणाबद्दल बोललात ? टरबूज ? म्हणजे कोण ? मी ज्यांना मागे फडतूस म्हणालो होतो ते का ? आता मी बोलत नाही.मी फडतूस म्हटले होते आता म्हणत नाही.मी त्यांना कलंक बोललो होतो पण आता बोलत नाही कारण त्यांना फार वाईट वाटते.त्यांनीच परवा रायगडमध्ये एक विनोद केला.बाकीची कामे सोडून द्या मोदींची,म्हणजेच मोदींनी काम केली नाही हे त्यांनी मान्य केले पण ते म्हणाले निदान मोदींनी आपल्याला करोना काळात लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो.जे काही संशोधक आहेत ते काय गवत उपटत होते का ? मोदींनी लस बनवली असेल तर ते काय करत होते ? लस पुण्यात तयार झाली आहे.मोदींनी लस हवेत सोडली नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे. टरबुजाचे काय करायचे ? तुम्हाला चांगलंच माहीत आहे.टरबुजाचे काय करायचे तुम्हाला माहीत आहे.टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येते.हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे.हे टरबूज नाहीच दिवाळीत चिरडता ते चिराट झालेत.आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री झालेत म्हणजेच चिराट झाले आहेत.होता केवढा झाला केवढा ? असे सगळे थापेबाजीचे राजकारण सुरु आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहे.