यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
तालुक्यातील वढोदा येथील एका घरात झालेल्या दोन लाख रूपयाहुन अधिकच्या धाडसी घरफोडीच्या संदर्भात पोलीसांनी आपला तपास हा योग्य दिशेने लावुन या गुन्ह्यातील दोन परप्रांतीय संशयीतांना ताब्यात घेण्यात पोलीसांना नुकतेच यश आले आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील वढोदा येथील रहिवाशी प्रदीप दिनकर सपकाळे रिक्शाचालक यांच्या घरात दि.२८ व २९ एप्रील रोजीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख पन्नास हजार रूपये व सोन्याचे दागीन्यांसह मोबाईल असे एकूण दोन लाख चौवीस हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची घटना उघडकीस आली होती.दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ किरण धनगर यांच्यासह पोलीसांच्या पथकाने वेगाने शोध कार्य केल्याने या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत संशयित आरोपी रेवलसिंग उर्फ सावन गुलसिंग बारेला वय २८ वर्ष राहणार जामन्या तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन (मध्य प्रदेश)हल्ली मुक्काम शेतकी शाळेच्यामागे अडावद तालुका चोपडा व मेगलासिंग उर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी वय ३० वर्ष राहणार बोकरान्या तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन या दोघांना ताब्यात घेण्यात आले असुन या गुन्ह्यात अजुन काही आरोपींचा सहभाग आहे का ? याचा शोध पोलीसांच्या वतीने घेण्यात येत आहे.