Just another WordPress site

“भाजपा सरकार चायनीज मॉडेलवर चालतेय” आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३ मे २४ शुक्रवार

भाजपा सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळ दाखवायला घाबरते अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते या अमित शाहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.आदित्य ठाकरे यांनी नुकताच एबीपी न्यूजला मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते.या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली.आजची भाजपा ही जुनी भाजपा नाही.आजची भाजपा ही चायनीज मॉडेलवर चालत आहे.ज्या चीनला डोळे दाखवायला केंद्रातील मोदी सरकार घाबरते मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या सरकारडून सुरू आहे असे ते म्हणाले.भाजपाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य नाही त्यांना लोकशाही मान्य नाही.आज देशातील महिला घाबरलेल्या आहेत. कर्नाटकातले उदाहरण ताजे आहे.कर्नाटकमधील रेवन्ना प्रकरण भयंकर आहे.भाजपाने मुंबईतही अशाच एका उमेदवाराला तिकीट दिले आहे अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेनेत फूट पडली कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता.या आरोपालाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले असूनअमित शाह यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही त्यांना आरोपच करायचे असतील तर ते करू शकतात पण शिवसेना का आणि कोणी फोडली हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.आज बाहेरचे लोक येऊन असली शिवसेने आणि नकली शिवसेना कोणती हे सांगत आहे.महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही असेही ते म्हणाले.पुढे बोलतांना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरूनही ताशेरे ओढले.निवडणूक आयोग आज पूर्ण भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे.आमचा पक्ष दोन गटात विभागला गेला तेव्हा त्याचा रिपोर्ट त्यांनी भाजपाच्या सांगण्यावरून लिहिला होता.आज निवडणूक आयोगाने आम्हाला जय भवानी जय शिवाजी हा नारा लाऊ नये असा आदेश दिला आहे.जय भवानी जय शिवाजी हे नारा महाराष्ट्रात नाही द्यायचा तर कुठे म्हणायचे ? एकंदरितच या लोकांचा महाराष्ट्र द्वेष पुढे आला आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.