Just another WordPress site

यावल येथे तालुका क्रिडा समितीच्या वतीने क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरिता यावल तालुका क्रीडा शिक्षकांची सभा  गटसाधन केंद्र यावल येथे गटशिक्षणाधिकारी नैमुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक के.यु.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली.

या सहविचार सभेत तालुक्यातील दहा खेळांचे दि.१६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २२ या कालावधीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा डॉ झाकिर हुसेन उर्दू हायस्कुल यावल,श्री दत्त हायस्कुल चिखली,विकास विद्यालय सातोद,ज्योती विद्यामंदिर सांगवी,डाॅ.डी.के.सी.विद्यालय डांभुर्णी,आदर्श विद्यालय दहिगाव,न्यु इंग्लिश स्कूल भालोद,इंग्लिश मेडियम निवासी माध्यमिक स्कूल दोनगाव,लोक विद्यालय पाडळसे,भारत विद्यालय न्हावी,या ठिकाणी १४,१७,व१९ या वयोगटातील मुले आणि मुली यांचा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.तालुका स्तर व जिल्हास्तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापक के.यू.पाटील यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या.यावल तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंजाबराव पाटील व क्रीडा शिक्षक जितेंद्र फिरके,जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षिका जोशी रत्नप्रभा पाटील हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त साजिद इष्ने शेख मेहबूब तसेच के.आर.सोनवणे,आर.एस.जावळे यांची पर्यवेक्षक पदी निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र फिरके तर आभार के.आर.सोनवणे यांनी मानले.यावेळी स्पर्धा समितीचे सदस्य जितेंद्र फिरके,दिलीप संगेले,रमेश जावळे,के.आर.सोनवणे,प्रवीण महाजन,सैय्यद  अश्फाक अली,एम.आर.महाजन,बी.डी.पाटील,मुख्याध्यापक पी.बी.पाटील,योगेश कोळी यांच्यासह तालुक्यातील विविध खेळातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.