यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ मे २४ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील रहीवाशी पार्वताबाई विठ्ठल चौधरी वय १००वर्ष यांचे वृद्धापकाळाने आज रात्री निधन झाले असून त्या यावल तालुक्याचे तिन वेळा आमदार म्हणुन प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या आई होत.त्यांची अंत्यविधी यात्रा किनगाव येथील राहते घर येथुन आज दि.६ मे २४ सोमवार रोजी दुपारी १२ वाजता निघणार आहे.
पार्वताबाई चौधरी या यावल तालुक्याचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी यांच्या आई व जिल्हा परिषद सदस्या सौ.रत्नाताई चंद्रकांत चौधरी यांच्या सासु होत.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.