Just another WordPress site

शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत त्वरीत निर्णय घेण्यास उद्धव ठाकरे यांचा जोरदार विरोध

सुनावणीस विरोध केल्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार?

 मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आम्हाला देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज दुपारी २ वाजेपर्यंत आपले  म्हणने मांडण्याचे निर्देश दिले होते.या निर्देशानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला एक लेखी पत्र सादर केले असून पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत त्वरीत निर्णय घेण्यास जोरदार विरोध दर्शवला आहे.तसेच जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाहीत तोपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये.एकनाथ शिंदे यांचा गट अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही.केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी आयोगाकडे सादर केलेल्या पत्रात केला आहे.आम्ही पक्षसंघटनेचे पुरावे एकत्रित करत असून निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडून आयोगाला पाहणी करण्यासाठी निमंत्रणही देण्यात आले आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून वेळेत उत्तर न आल्यास धनुष्यबाण चिन्हाविषयी आयोगाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असा इशारा काल निवडणूक आयोगाकडून देण्यात आला होता.त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्वरित सुनावणीस विरोध केल्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम ३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे अशी मागणी करणारे पत्र ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला दिले होते.शिंदे गटाचे वकील चिराग शहा यांनी त्याच दिवशी या पत्राची प्रत ठाकरे गटाला ईमेल केली होती याचा उल्लेख निवडणूक आयोगाने शुक्रवारच्या पत्रात केला.आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटाने शुक्रवारी प्रथमच आपले प्राथमिक लेखी निवेदन आयोगासमोर सादर केले.शिंदे गटाची कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली.त्यासाठी ठाकरे गटासाठी शुक्रवारची शेवटची मुदत होती.निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्याच्या आत दुपारी ४ वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाकडे दस्तावेज सादर केले.ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्हाची मागणी करणाऱ्या शिंदे गटाच्या मागणीवरील प्रतिसादासह २९ सप्टेंबर रोजी मागितलेला दस्तावेज सादर करावा असे निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटले आहे.ठाकरे गटाकडून उत्तर न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर योग्य तो निर्णय घेईल !असेही आयोगाने या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.