छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
पराभव दिसताच भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण जातो अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.तसेच येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.ते छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते.देशभरात भाजपाविरोधी वातावरण आहे त्यामुळे मतदार आणि गावातील सरपंचांना धमकी दिली जात आहे.भाजपाला त्यांचा पराभव दिसू लागला आहे परिणामी पराभव दिसताच भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला जातो.जिथे-जिथे पराभव दिसायला लागतो तिथे-तिथे भाजपाकडून वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण केले जातो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आज गॅसचे दर १००० पार गेले असून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे.भाजपाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासनही भाजपाने पूर्ण केलेले नाही.देशात आज हुकूमशाहीचे वातावरण आहे तसेच भाजपाला देशाच्या संविधानात बदल करायचा आहे असेही ते म्हणाले.यावेळी बोलतांना त्यांनी ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे.भाजपा ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न बघते आहे मात्र त्यांना २०० जागाही मिळणार नाही त्यामुळे येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.