आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत बोलतांना वायकर म्हणाले,माझ्याविरोधात झालेली तक्रार ही फौजदारी स्वरुपाची नव्हतीच. मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले.माझे प्रकरण राजकीय होते असे वकिलांनीही मला सांगितले.माझ्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही त्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.आता त्याच किरीट सोमय्यांना तुमचा प्रचार करावा लागणार का ? असा प्रश्न रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,किरीट सोमय्यांना मी प्रचारासाठी बोलावले नाही त्यामुळे ते माझ्या प्रचारात सहभागी होणार नाहीत तसेच संजय निरुपम यांनीही आरोप केले होते मात्र आता तेच तुमचा प्रचार करत आहेत या प्रश्नावर बोलताना वायकर म्हणाले,संजय निरुपम यांनी गैरसमजुतीमधून आरोप केले होते त्यांना सत्य कळल्यानंतर ते माझ्यासाठी प्रचाराला लागले आहेत.लोकसभेत निवडून गेल्यानंतर कोणती काम करणार ? याबाबतही वायकर यांनी भूमिका मांडली.जोगेश्वरीमधील गुहा वाचविणे,आरेच्या जंगलाचे संवर्धन करणे,विमानतळामुळे बाधित झालेल्या लोकांच्या समस्या सोडविणे,ना विकास क्षेत्रासंबंधी निर्णय घेणे आणि सीआरझेडच्या नियमांना शिथिल करून विकासाला चालना देणे या पाच मुद्दयांवर अधिक भर देणार असल्याचे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.