सदरील खळबळजनक दावा करत असतांना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली.गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे कारण मी त्यांचे ऐकत नाही तसेच ते हुकूमशहा आहेत व त्यांना वाटते ते म्हणतील तसेच व्हावे नाहीतर ते तुरुंगात टाकतील व मी मागेही याबाबत बोललो होतो.माझ्याविरोधात एसआयटी स्थापन करणे,खोटे व्हिडीओ बनवणे,माझ्या विरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसविणे व त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे असले प्रयोग करून झाले आहेत असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.आपल्या कुटुंबावर हल्ला होणार हे तुम्हाला कसे समजले ? असा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.माझ्या माहितीचा स्त्रोत सांगू शकत नाही पण ही माहिती देणारे गृहमंत्र्यांच्याच आजूबाजूचे आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.