देशातील जनतेचा कल इंडिया आघाडीच्या बाजूने दिसत असल्याचेही केजरीवाल म्हणाले.तुरुंगातून सुटल्यानंतर गेल्या २० तासांत मी निवडणूक तज्ज्ञ व जनतेशी चर्चा केली आणि मला कळले की भाजपचे सरकार येणार नाही.‘इंडिया आघाडी’ सत्तेत येणार असून आम आदमी पक्ष सरकारमध्ये सामील असेल.आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ असे केजरीवाल यांनी सांगितले.केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.‘‘हुकूमशाही लादण्यासाठी मोदी ‘एक राष्ट्र, एक नेता’ मोहीम राबवत असून विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकून राजकीय विरोध संपुष्टात आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत’’ अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन,राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आदी नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.तसेच भाजप सत्तेत आल्यास दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीही बदलला जाईल असे भाकीतही अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ मे २४ रविवार
भाजप पुन्हा सत्तेवर आला तर २०२५ नंतर नरेंद्र मोदी नव्हे तर अमित शहा देशाचे नेतृत्व करतील कारण भाजपमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हावे असा नियम आहे व या नियमानुसार मोदी पुढील वर्षी निवृत्त होतील त्यामुळे पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांचे उत्तराधिकारी अमित शहा यांच्यासाठी मते मागत आहेत असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दि.११ मे शनिवार रोजी केला आहे.मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल शुक्रवार रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले.आम आदमी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी काल शनिवार रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भाजपचे नेते इंडिया आघाडीच्या नेत्यांना विचारतात तुमचा पंतप्रधान कोण ? मात्र मी त्यांना विचारतो की तुमचा पंतप्रधान कोण होणार आहे ? कारण नरेंद्र मोदी पुढील वर्षी १७ सप्टेंबरला ७५ वर्षांचे होत आहेत.त्यांनीच असा नियम बनवला आहे की पक्षाचे जे सदस्य ७५ वर्षांचे आहेत त्यांना निवृत्त व्हावे लागेल.त्यांनी लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी,सुमित्रा महाजन या नेत्यांना निवृत्त केले.या नियमानुसार मोदींनाही निवृत्त व्हावे लागणार आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.