आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे तर शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील अशी चर्चा आहे त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो.याबाबत एकनाथ खडसे म्हणाले,रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे काम करत आहेत त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचेच काम करणार व यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही.मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे.शरद पवारांनी मला सांगितले आहे की,मी दिलेली वस्तू परत घेत नाही.शरद पवारांनीच मला अभय दिले असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही.मी राजकीय माणूस आहे पण आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.