दरम्यान जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणेस आपतकालीन परिस्थीतीसाठी सज्ज राहणेच्या सुचना देण्यात आल्या तसेच सरकारी व खाजगी दवाखान्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तु मिळुन आलेली नाही.या तपासणी व शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज,प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभाग,कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगल विरोधी पथक,दहशतवाद विरोधी पथक व शाखा,वाहतुक शाखा,रेल्वे पोलीस पथक असे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हजर होते. सांगली व मिरज रेल्वे स्टेशन तसेच जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवणेत आलेला आहे.धमकी देणाऱ्या अनोळखी इसमाविरुध्द सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करणेत आलेला असून सदर इसमाचा शोध सुरु आहे.सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की,कोणतीही संशयित वस्तु अथवा इसम आढळुन आल्यास त्याबाबत तात्काळ नजिकच्या पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क करुन त्याबाबत माहिती द्यावी.जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य अशी सर्व खबरदारी घेत असुन कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन सांगली पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.