Just another WordPress site

एकाच कुटुंबातील विधवा महिला आपल्या दोन चिमुकल्यासह चौघे बेपत्ता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ मे २४ गुरुवार

शहरातील शिवाजीनगर भागातील किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका असे चौघे जण बेपत्ता झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान हे चौघेजण घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले असुन मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाले आहे.कुटूंबाच्या वतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतले असता ते मिळून आले नसल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.सदरहू एकाच कुटुंबातील चौघेजण अचानक बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील शिवाजी नगरात किल्ला परिसर वस्तीतील रहिवाशी संगीता दिलीप सोनार वय ४८ ही वृद्ध महिला आपली विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार वय २६ वर्ष,गणेश मुकेश सोनार वय ७ वर्षे व पियू मुकेश सोनार वय ४ वर्ष हे चौघेजण वास्तव्याला होते.दरम्यान खबर देणार गणेश दिलीप सोनार यांचे मेहुणे मुकेश अशोक सोनार यांचे मागील महिन्यात किडनीच्या आजाराने दुदैवी निधन झाले असल्याने विधवा झालेली बहीण मिनाक्षी सोनार हे शिवाजीनगर येथील त्यांच्या भाऊकडे राहात होते.मिनाक्षी सोनार ही वृद्ध महिला व तिचे दोन लहान मुलांसह दि.९ मे गुरुवार रोजी आपल्या घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले.याबाबत कुटुंबातील व परिसरातील नागरीकांकडून या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला तसेच नातेवाईकांकडे तपास केला मात्र हे चौघे कुठेच मिळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवलेल्या विधवा मिनाक्षी सोनार यांचा भाऊ गणेश दिलीप सोनार यांनी दिलेल्या खबरीवरून या चौघांच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.दरम्यान शहरातुन विधवा महिलेसह एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या चौघांचा शोध यावल पोलीसांच्या वतीने घेतला जात आहे असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.