यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ मे २४ शनिवार
तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी व पत्रकार विकास पाटील व शशिकांत पाटील यांच्या मातोश्री मंगलाबाई गोरख पाटील वय ६४ यांचे काल दि.१७ मे २४ शुक्रवार रोजी वृध्दपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात शोककळा पसरली आहे.
त्याचा पश्चात कुटुंबात पती,दोन मुले,एक मुलगी,सूना,पुतणे,नातवंड असा मोठा परीवार आहे.मंगलाबाई पाटील या सेवानिवृत्त शिक्षक गोरख शंकर पाटील यांच्या पत्नी तसेच पत्रकार विकास पाटील व शशिकांत पाटील यांच्या आई होत.