यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ मे २४ शनिवार
शैक्षणिक वर्ष २४-२५ या वर्षांसाठी शिक्षण हक्क अधिनियम आरईटीच्या माध्यमातुन २५ टक्के आरक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी संपुर्ण राज्यात सुधारीत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन पद्धतीने दि.१७ मे पासुन सुरुवात करण्यात आली असुन विद्यार्थी पालकांनी तात्काळ या प्रवेश प्रक्रीयेत सहभाग घेऊन आपल्या मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश मिळुन घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या नविन शैक्षणीक नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आपल्या हक्काच्या शिक्षणापासून वंचीत राहू नये याकरीता या शैक्षणिक वर्षात सदर नियमांची तात्काळ अमलबजावणी करण्यात आली असुन यात आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या घटकांसाठी विद्यार्थी राहात असलेल्या परिसरापासुन खाजगी शाळा ही १ किलोमिटर लांबीवर राहणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना मोफत (विनामुल्य ) शिक्षण मिळणार आहे.दरम्यान यावल तालुक्यातील एकुण १७ खाजगी असलेल्या शाळेत प्रवेश मिळवण्याचे प्रक्रीयेला सुरूवात झाली असून दि.१७ मे ते ३१ मे या कालावधीत पर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती यावल तालुका गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे. सदरच्या शासन आदेशाची अमलबजावणी न करणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असे ही यावलचे गटशिक्षणधिकारी धनके यांनी म्हटले आहे.