चुंचाळे येथे श्री स्वामी समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ रघुनाथ बाबा गुरू शिष्य यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २४ रविवार
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत उद्या दि.२० मे सोमवार रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा एकाच तिथीवर एकाच तारखेला वैशाख शुद्ध बारसला गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा श्री समर्थ वासुदेवबाबा दरबार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची महती हि पुढीलप्रमाणे आहे.
यात चुंचाळे हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून येथे १२५ वर्षांपूर्वी श्री समर्थ सुकनाथ बाबांनी १२ वर्षे तप केला म्हणून चुंचाळे ता.यावल ही त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते.श्री समर्थ रघुनाथ बाबा हे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचे पुत्र,शिष्य असुन चुंचाळे हे त्यांचे जन्मस्थळ असुन सुकनाथ बाबांचा नात सांप्रदायाच्या गादीचा वारसा त्यांनी चुंचाळे येथे पुढे सुरू ठेवला.
सन १९३५ मध्ये फाल्गुन शुद्ध पाडवा श्री समर्थ सुकनाथ बाबा व १९७९ वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ रघुनाथ बाबा समाधीस्थ झाले आहे.दोघे पिता-पुत्रांची समाधी वर्डी तालुका चोपडा येथे आहे.श्री समर्थ वासुदेव बाबा हे श्री रघुनाथबाबा यांच्या जवळ वर्डी तालुका चोपडा येथे राहत असत.श्री समर्थ रघुनाथ बाबांनी श्री समर्थ वासुदेव बाबांना वरणगाव जवळचे फुलगाव येथे हनुमान मंदिरात गुरुमंत्र दिला होता.श्री समर्थ रघुनाथ बाबा १९७९ मध्ये चोपडा येथे समाधीस्थ झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्य श्री वासुदेव बाबा यांना चुंचाळे तालुका येथे जाऊन नाथ संप्रदायाची पताका उंचकर व जनसामान्याच्या संपर्कात राहून त्यांचे कामे कर असा आदेश श्री रघुनाथ बाबांनी दिला.त्यावेळेस श्री समर्थ वासुदेव बाबा हे चुंचाळे ता.यावल येथे आले व त्यांनी सर्वात पहिले काम म्हणजे गावामध्ये दोन गटांतील धर्माची भिंत पाडली व ती तेड मिटवली व सर्वांना एकत्र करून गावाचा तसेच मंदिराचा विकास केला.
श्री समर्थ वासुदेव बाबा हे बालब्रह्मचारी होते,जुन्या मठाचे भल्यामोठ्या दरबारात रूपांतर श्री समर्थ वासुदेवबाबा चुंचाळे येण्याच्या आधी गावात एक पुरातन मठ होता त्या ठिकाणी एक फक्त जुनी समाधी होती,बांधकाम मात्र कोणतेही नव्हते श्री समर्थ वासुदेवबाबांनी गावकऱ्यांच्या, परिसराच्या व श्री सुकनाथ बाबा,श्री रघुनाथ बाबा व त्यांच्या सर्व भक्तांच्या मदतीने गावात भलेमोठे मंदिराचे निर्माण केले.महाराष्ट्रसह गुजरात, मध्य प्रदेश परप्रांतात देखील त्यांचे शिष्य मोठ्या प्रमाणात आहे असा आगळावेगळा आणि दुर्मिळ गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा.गुरुश्री समर्थ रघुनाथ बाबा हे वैशाख बारसला १९७९ मध्ये समाधीस्थ झाले.त्यांच्या गुरुची पुण्यतिथी श्री वासुदेव बाबा चुंचाळे येथील मंदिरात आंब्याचा रस व पुरणपोळी प्रसाद देऊन साजरे करत असत.श्री समर्थ वासुदेवबाबा गावातील भक्तांना सांगायचे की मी ज्यावेळेस नसेल त्यावेळेस माझ्या गुरुची पुण्यतिथी (श्री समर्थ रघुनाथबाबा) अशीच तुम्ही साजरी करत चला तेव्हा शिष्यमंडळ म्हणायचे की जसे तुम्ही तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात तशी आम्ही आमचे गुरु म्हणजे ( श्री समर्थ वासुदेवबाबा)तुमची पुण्यतिथी साजरी करत जाऊ यावर श्री समर्थ वासुदेवबाबा हसत म्हणायचे काही हरकत नाही माझी पुण्यतिथी आणि व माझ्या गुरुची पुण्यतिथी एकच राहील.याचाच प्रत्यय म्हणून श्री समर्थ वासुदेवबाबा यांनी सन २००० साली श्री समर्थ रघुनाथबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ वासुदेव बाबांनी आपल्या देहाचा त्याग केला.त्यांचे समाधी स्थळ चुंचाळे ता. यावल या ठिकाणी आहे म्हणूनच सण २००१ सालापासून गुरु श्री समर्थ रघुनाथबाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेवबाबा असा दुर्मिळ योग असलेला गुरु आणि शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक २० मे वैशाख शुद्ध बारसला चुंचाळे येथे सालाबाद प्रमाणे साजरा होत आहे.विशेष म्हणजे श्री समर्थ वासुदेव बाबा यांचे मंदिर शिरपूर जि.धुळे,विखरण ता.एरंडोल येथे भक्तांनी प्रशस्त असे बनवले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे राहणार आहे.
सकाळी ६ वाजता आरती ७ ते १० भजने व भारुडे,११ वाजता महाआरती,१२ ते ५ महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकनाथ बाबा,श्री रघुनाथ बाबा,श्री वासुदेवबाबा यांचे शिष्य मंडळ व चुंचाळे -बोराळे तसेच परिसरातील गावकऱ्यांनी आवहान केले आहे.
कार्यक्रमाचे विशेष
रात्रभर गावातील महिला जागरण करून या खापरावरच्या पुरणपोळ्या तयार करतात यामध्ये पूर्ण गाव जसा काही आपल्या घरचाच कार्यक्रम आहे असे गावातील नवतरुण,अबाल वृद्ध,पुरुष व महिला पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभर काम करून हा कार्यक्रम आनंदाने पार पाडतात हे विशेष.