आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मे २४ मंगळवार
मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असून आम्ही जागरुक आहोत.माझी महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही १०० टक्के मतदान करा असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे तसेच मनोज जरांगेंनी ४ जूनसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.मनोज जरांगेंनी मराठा बांधवांनाही हे आवाहन केले आहे मतदान करा तसेच ज्याला पाडायचे आहे त्या उमेदवाराला पाडा.आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.मराठवाडा,विदर्भातले बांधव मला भेटून गेले.आमची चर्चा झाली.दि.३ जूनला सगळे येणार आहेत कारण ४ जूनपासून मी आमरण उपोषण करणार आहे.पाठिंबा,पाठबळ देण्यासाठी हे सगळे येत आहेत.मी लढणार आहे.जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कठोर आमरण उपोषण करणार आहे.दि.४ जून ही तारीख त्यासाठी नक्की झाली आहे.तीन महिन्यांपूर्वीच ही तारीख नक्की झाली आहे यामध्ये काहीही झाले तरीही बदल होणार नाही.माझ्या समाजाचा आग्रह आहे की मी उपोषण करु नये मात्र मी उपोषणावर ठाम आहे. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्या शिवाय मी शांत बसणार नाही असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.मी राजकारणात पडणार नाही.मी कुठूनही उभा राहणार नाही.माझ्यामागे राजकारणाचा काही विषय ठेवू नका.निवडणुकीला उभा राहणार नाही.जर सगेसोयऱ्यांची अमलबजावणी केली नाही तर मात्र १०० टक्के मराठा समाज मैदानात उतरणार आहे.मी देखील मैदानात उतरणार आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
मी जर चौथ्या टप्प्यात प्रचार केला तर संताजी-धनाजींसारखा पाण्यात का दिसायला लागलो ? मी लातूर,धाराशिव,परभणी,जालना, संभाजीनगर,नाशिक सगळ्या ठिकाणी गेलो.मी काही कुणाला पाडाही म्हटले नाही आणि आणाही म्हटले नाही.माझा समाज मला वाऱ्यावर सोडत नाही.माझ्या समाजाला न्याय देण्याचे काम मी करतो आहे.मी माझ्या जिवाची बाजी लावली आहे.माझा मराठा समाजाला शब्द आहे की जीव गेला तरीही मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटत नाही.आमच्या आया बहिणींवर हल्ले करा,लाखो पोरांवर केसेस दाखल करा पण आता आम्ही मागे हटणार नाही.ज्यांना त्रास झाला ते पण जास्त ताकदीने आंदोलनावर ठाम आहेत.४ जूनला तुम्हाला मराठ्यांची ताकद काय आहे ते समजेल असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.आमचे शांततेचे युद्ध कुणीही रोखू शकत नाही.माझ्या समाजाला मी शांत राहा सांगितले की कुणीही माझा शब्द मोडत नाही असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.जे आम्हाला हिणवतील,अपमान करतील त्यांना आमचा समाज पाहून घेईल असेही जरांगेंनी म्हटले आहे.काही लोकांना सवय असते की ते जाती-पातीचेच राजकारण करतात मात्र आमच्यासाठी तो विषय संपला.मी शांत आहे आमचा समाज शांत आहे.आम्ही आता त्यांना सुधारण्याची संधी देत आहोत असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आम्हाला सांगावे की आम्ही कुठे जातीवाद केला ? मी एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेले नाही.नेत्यांना सोडत नाही पण ते बोलल्याशिवाय मी बोलत नाही.समोरचा बोलला तर मी सोडत नाही.मी १३ मेपर्यंत चांगला होता व १४ मे पासून वाईट झालो असे म्हणत मनोज जरांगेंनी पोस्ट करणाऱ्यांना टोला लगावला आहे.