भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितले की,स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती.इतका मोठा स्फोट होता की,आम्ही सगळे बाहेर पडलो.सगळे आगीचे लोळ येत होते.आमच्या हाताला भाजले आहे असे कामगाराने एका चॅनलला सांगितले.काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,मोठे स्फोट झाले,दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले.अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत.अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. बॉयलरचा स्फोट झाला आहे त्यामुळे कंपनीत आग लागली आहे.दरम्यान आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत.जखमींना आम्ही विविध रुग्णालयात दाखल केले आहे.४८ जण या घटनेत जखमी झाली आहे.अतिधोकादायक रसायन तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ.येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.