Just another WordPress site

दहिगाव येथील शेतमजुर तरूणाचा उष्मघातामुळे दुदैवी मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ मे २४ सोमवार

तालुक्यात तापमानाने प्रथमच ४६सेल्शियस पार केल्यामुळे तापमानाने नवा उचांक गाठला असुन ताल्यक्यातील दहिगाव येथील तरुणाचा या उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली असून तालुक्यातील उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची हि दुसरी घटना घडली आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके वय २७ वर्ष या तरुणाचा नुकताच वाढत्या तापमानाने मृत्यू झाला आहे.सदरहू वैभव फिरके हा तरुण नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेचे सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले असता त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असतांना तो मयत स्थितीत आढळून आला असून वाढत्या तापमानाने त्या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे सिद्ध झालेले आहे.दरम्यान उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरा घटना आहे.मयत वैभव फिरके याच्या  पश्चात आई,तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.सदरील तरुणाची परिस्थिती फारच हलाखीची असून सदर युवकाच्या परिवारावाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.