सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत हे दुर्दैवी कुटुंब तासगावचे आहे.तासगाव मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एक अल्टो मोटार ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे.
सदरील अपघातात मयत झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.सदर मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय ६० वर्षे,सुजाता राजेंद्र पाटील वय ५५,प्रियांका अवधूत खराडे वय ३०,बुधगाव यांच्यासह ध्रुवा वय ३,कार्तिकी वय १ आणि राजवी वय ३ यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले वय ३० ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.