Just another WordPress site

थोरपाणी येथील चौघे मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबियांना रक्षाताई खडसे यांची भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ मे २४ बुधवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रात दि.२६ मे रविवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाळयात घर कोसळून एकाच कुटूंबातील चार जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता.सदर कुटुंबाला रावेरच्या खा.रक्षाताई खडसे यांनी शासनाची योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आंबापाणी येथे आज रोजी दिली आहे.सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या आंबापाणी या अतिदुर्गम भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर वादळात घर कोसळून झालेल्या अपघातात एकाच आदिवासी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली होती.दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आंबापाणी या घटनास्थळी खा.रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्थानिकांकडून घटनेची माहिती घेतली.सदरील घटनेत मरण पावलेल्या नानसिंग पावरा त्यांचे वयोवृद्ध वडील गुला पावरा व अपघातातुन सुदैवाने बचावलेला कुटुंबातील ८ वर्षाचा शांतीलाल पावरा यांची भेट घेत सांत्वन करीत धीर दिला तसेच पाड्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक आदिवासी नागरिकांशी खा.रक्षाताई खडसे यांनी संवाद साधला.

या घटनेत आदिवासी कुटुंबातील नानसिंग गुला पावरा,त्यांच्या पत्नी सोनुबाई नानसिंग पावरा,रतीलाल नानसिंग पावरा व बालीबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संबंधित कुटुंबाला व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून योग्यती भरीव मदत तात्काळ मिळावी यासाठी आपण सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याची माहीती रावेर लोकसभेच्या खा.रक्षाताई खडसे यांनी दिली व याप्रसंगी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.यावेळी पाडयावरील नागरीकांना व्यवस्थित व वेळेवर स्वस्त धान्य मिळत नसल्याची तक्रार देखील या वेळी खा.रक्षाताई खडसे यांच्याकडे आदिवासी बांधवांनी केली.प्रसंगी यावल कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आश्रय फाउंडेशनचेअध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य समिती समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,खरेदी विक्री संचाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे,पंचायत समितीचे माजी सभापती भरत महाजन,सरपंच संघटनेचे पुरूजीत चौधरी,डॉ.सुनील पाटील,अनिल पाटील, आदीवासी कार्यकर्ते इडा बारेला आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.