Just another WordPress site

मोदी तुम्ही शाळेत गेला असतात तर..” महात्मा गांधींवरच्या वक्तव्यावरुन प्रकाश राज यांचा पंतप्रधानांना टोला

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० मे २४ गुरुवार

महात्मा गांधींना कुणीही ओळखत नव्हती व त्यांच्यावर चित्रपट आला आणि जगात त्यांची ओळख निर्माण झाली.जगभरात त्यांचे विचार पोहचवण्यासाठी ७५ वर्षांत काहीही झाले नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत.या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिले आहे तर अभिनेते प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच्या वक्तव्यावरुन सवाल केला आहे.महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्त्व होते व आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती ही आपली जबाबदारी होती मात्र आपण त्यात अपयशी ठरलो.त्यांना कोणी ओळखत नव्हते ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण होते ? याबाबत कुतूहल निर्माण झाले.त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केले नाही.

जगभरात जर मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेलांना ओळखले जाते मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते.मी संपूर्ण जग फिरलो आहे मात्र गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नाही.आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारांत आहे.आपण खूप काही गमावले आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांधींबाबत प्रतिक्रिया दिली.मात्र प्रकाश राज यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात,पंतप्रधान नरेंद्र मोदी सर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.तुम्ही जर शाळेत गेला असतात तर तुम्हाला महात्मा गांधींबाबत समजले असते.ज्या व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवता त्याच्या कक्षा थोड्या रुंदावल्या पाहिजेत असे म्हणत हा व्हिडीओ प्रकाश राज यांनी पोस्ट केला आहे.महात्मा गांधींनी युरोपचा दौरा केला होता तसेच त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.महात्मा गांधी जेव्हा पॅरीसला गेले तेव्हा त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथे गर्दी झाली होती.महात्मा गांधी अमेरिका,फ्रान्स,जर्मनी,इटली या देशांमध्येही गेले होते ही सगळी माहिती देणारा हा व्हिडीओ आहे.तसेच ३० जानेवारी १९४८ या दिवशी त्यांची हत्या झाली तेव्हा जगभरात बातम्या आल्या होत्या असेही या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.हा व्हिडीओ पोस्ट करत प्रकाश राज यांनी मोदींना तुम्ही शाळेत का गेला नाहीत ? असा प्रश्न विचारला आहे.राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मोदींच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच चित्रपट बघावे लागतील असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.