यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
येथील तहसील कार्यालयात महसुल प्रशासनाच्यावतीने मान्सुनपुर्व आढावा घेण्यासंदर्भात दि.२९ मे बुधवार रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीला तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना मान्सुनपुर्व दक्षता घेण्याच्या व आपआपल्या विभागा अंतर्गत करावयाचे कामकाजा बाबत,नगरपरिषदेला शहरातील नाले आणि गटारी साफ करण्याबाबत,महावितरण कंपनीला पावसाळयात वेळोवेळी झाडे पडून व वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास नागरीकांची गैरसोय होण्याच्या दृष्टीकोणातुन काळजीपुर्वक तात्काळ विजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत,सार्वजनिक बांधकाम विभागास पावसामुळे विविध ग्रामीण क्षेत्रांना जोडणारे पूल रस्ते यांचे काही नुकसान झाल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती होणेबाबत,कृषी आणि महसूल विभागाला पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वेळोवेळी तात्काळ प्रभावाने करण्याबाबत,हतनूर व तालुक्यातील आदि ठीकाणच्या इरिगेशन विभागाला अतिवृष्टी झाल्यास धरणातील वाढणाऱ्या पाण्याचा फ्लोची सूचना वेळोवेळी देण्याबाबत व वड्री धरण,मोरधरण,निंबादेवी धरण,मनुदेवी धरण येथील पाण्याचा प्रवाह याबाबत कार्यालयास वेळोवेळी तातडीने अपडेट देण्याबाबत,वन विभागाला देखील पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे कट करून रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत अशा विविध विभागांना सूचना देण्यात आल्या.तसेच जर कुठे आपत्ती आलीच आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आलीच तर त्याकरिता पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याच्या सूचनाही यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी उपस्थित विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.सदर आढावा बैठकीला निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,तालुका कृषी अधिकारी भरत वारे,सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये,वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपीक विकास जंजाळे यांच्यासह आदी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.